Vivo X200 Pro vs X200: कोणता फोन आहे तुमच्यासाठी योग्य?

 Vivo X200 Pro vs X200: कोणता फोन आहे तुमच्यासाठी योग्य?

नमस्कार मित्रांनो! आज मी तुम्हाला Vivo X200 सिरीजच्या फोनचं बद्दल सांगणार आहे. X200 Pro आणि X200 या दोन्ही फोनबद्दल कॅमेरा, डिस्प्ले, बॅटरी आणि इतर खास फीचर्सची माहिती देणार आहे. चला, तर मग सुरु करूया!

 डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी

 X200 Pro चं कॅमेरा मॉड्यूल खरंच मोठं आहे, आणि ते स्मार्टफोनपेक्षा कॅमेऱ्यासारखं वाटतं. X200 चं कॅमेरा मॉड्यूल थोडं लहान आहे. X200 Pro चं वजन 231 ग्रॅम आहे, तर X200 चं वजन 205 ग्रॅम. दोन्ही फोनमध्ये ग्लास बॅक आणि आर्मर ग्लासचा वापर केला आहे, जो त्यांना एक प्रीमियम फील देतो.

डिस्प्ले

X200 Pro मध्ये 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, तर X200 मध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले ZEISS प्रमाणित आहेत आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतात. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 4500 निट्स आहे, जी HDR10+ आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करते. म्हणजेच, तुम्हाला एक अद्भुत व्हिज्युअल अनुभव मिळेल!

Motorola ने लॉन्च धासू smartphone, काय आहे खास ?

कॅमेरा

X200 Pro मध्ये 50MP सोनी LYT818 सेन्सर, 50MP अल्ट्रावाइड सेन्सर आणि 200MP टेलिफोटो सेन्सर आहे. X200 मध्ये 50MP टेलिफोटो सेन्सर आहे, जो 3x झूम देतो. दोन्ही फोनमध्ये 4K 120FPS व्हिडिओ रेकॉर्डिंग, डॉल्बी व्हिजन आणि सिनेमॅटिक पोर्ट्रेट व्हिडिओची सुविधा आहे.X200 Pro चा कॅमेरा DSLR सारखं परफॉर्म करतो, आणि कमी प्रकाशातही त्याची गुणवत्ता उत्कृष्ट आहे. टेलिफोटो सेन्सरमुळे तुम्ही 3.7x झूमवरही कमाल फोटो काढू शकता.

परफॉर्मन्स आणि बॅटरी

दोन्ही फोनमध्ये डायमेन्सिटी 9400 प्रोसेसर आहे. X200 Pro मध्ये 6000mAh बॅटरी आहे, तर X200 मध्ये 5800mAh बॅटरी आहे. X200 Pro 120W चार्जिंगला सपोर्ट करतो, तर X200 90W चार्जिंगला सपोर्ट करतो. X200 Pro मध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे, जी खूपच आरामदायक आहे.

दोन्ही फोनमध्ये LPDDR5X रॅम आणि UFS 4.0 स्टोरेज आहे. गेमिंगसाठीही हे फोन उत्तम आहेत, कारण त्यांची थर्मल परफॉर्मन्स चांगली आहे.


सॉफ्टवेअर आणि इतर फीचर्स

दोन्ही फोनमध्ये FunTouch OS 15 आहे, जो अँड्रॉइड 15 वर आधारित आहे. यामध्ये तुम्हाला 4 वर्षांचे मेजर अपडेट्स आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. फोनमध्ये AI लाईव्ह ट्रान्सलेशन, AI नोट असिस्ट आणि सर्कल टू सर्च सारखी खास AI फीचर्स आहेत.

Vivo x200 pro buy

किंमत

X200 ची किंमत सुमारे 65-66 हजार रुपयांपासून सुरू होते, तर X200 Pro ची किंमत सुमारे 90 हजार रुपये आहे.

निष्कर्ष

Vivo X200 Pro हा कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत एकदम उत्कृष्ट आहे. जर तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सर्वोत्तम कॅमेरा आणि परफॉर्मन्स हवे असेल, तर Vivo X200 Pro आहे एक उत्तम पर्याय. तुमच्या टेक प्रेमात आणखी रंग भरायला तयार आहे!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म